Who invented the computer? कॉम्प्युटरचा शोध कोणी लावला?
![]() |
photo_by_aditya_chin_XEu5w |
John Napier (1550-1617) invented the logarithm. Tables of logarithms made it easy to do mathematical calculations. The British inventor Charles Babbage (1992-1871) came up with the idea that there should be a device to memorize logarithm tables and keep the numbers in front of you whenever you want. Babbage designed all kinds of arithmetic machines and built a machine accordingly. He made this device in 1833. He called that device the Analytical Engine. That device had the basic features of today's computer. Some things could not be fulfilled in that device made by Babbage. The British government also provided financial assistance to Babbage for the manufacture of the device. But due to inadequate technology, Babbage's dream of building a computer remained unfulfilled. It is safe to say that Babbage invented the computer because of his efforts to make computers!
जॉन नेपियरने (१५५०- १६१७) लॉगॅरिथमचा शोध लावला. लॉगॉरिथमच्या तक्त्यांमुळे गणिती आकडेमोड करणे सोपे झाले. लॉगेरिथमचे तक्ते लक्षात ठेवणारे आणि त्यातले आकडे पाहिजे तेव्हा आपल्यासमोर ठेवणारे एखादे यंत्र असायला हवे अशी कल्पना ब्रिटीश संशोधक चार्लस् बॅबेज (१९९२-१८७१) यांना सुचली. बॅबेज यांनी सर्व प्रकारची आकडेमोड करणाऱ्या यंत्राचा आराखडा तयार करून त्यानुसार एक यंत्र तयार केले. हे यंत्र त्यांनी १८३३ मध्ये तयार केले. त्या यंत्राला त्यांनी एनालिटीकल इंजिन असे नाव दिले. त्या यंत्रात आजच्या कॉम्प्युटरची पायाभूत वैशिष्ट्ये होती. बॅबेज यांनी बनविलेल्या त्या यंत्रात काही गोष्टींची पूर्तता होऊ शकली नाही. ब्रिटीश सरकारने बॅबेज यांना त्या यंत्राच्या निर्मितीसाठी आर्थिक मदतही दिली होती. पण अपुऱ्या तंत्रज्ञानामुळे बॅबेज यांचे कॉम्प्युटर बनविण्याचे स्वप्न अपुरेच राहिले. बॅबेज यांनी कॉम्प्युटर बनविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे बॅबेज यांनी कॉम्प्यूटरचा शोध लावला असे म्हणायला हरकत नाही!
Even before Babbage, the idea of a calculator was invented by two mathematicians, Blaise Pascal (1623-1662) and Gofrid Wilhelm Leibniz (1646-1716).
बॅबेजच्याही अगोदर आकडेमोड करणाऱ्या यंत्राची म्हणजे कॅलक्युलेटरची कल्पना ब्लेज पास्कल (१६२३- १६६२) व गॉफ्रिड विल्हेम लिबनिझ (१६४६- १७१६) या दोघा गणित तज्ज्ञांना सुचली होती.
The Harvard Mark-1 is the world's first computer. It was designed by Howard Aiken. The computer was developed in 1944 by the International Business Machine (IBM) and Harvard University.
हार्वर्ड मार्क - १ हा जगातला पहिला कॉम्प्युटर होय. त्याचा आराखडा हॉवर्ड आयकेन यांनी तयार केला होता. इंटरनॅशनल बिझिनेस मशीन (IBM) ही कंपनी आणि हार्वर्ड विद्यापीठ यांनी १९४४ साली या कॉम्प्युटरमध्ये सुधारणा घडवून आणल्या.
![]() |
ENIAC |
The world's first electronic digital computer was developed in February 1946 at the University of Pennsylvania in the United States. It came to be known as ENIAC (Electronie Numerical Integrator And Caleulalor). In the first generation, this computer was based on vacuum tube technology. He multiplied ten-digit numbers by three milliseconds. So every second he was adding five thousand! The ENIAC computer had eighteen thousand vacuum tubes, seventy thousand resistors, ten thousand capacitors and six thousand buttons. It was a hundred feet long, 10 ft. high, and 3 ft. wide. It weighed thirty tons. It used to take one hundred and 50 kw of electricity to run.
![]() |
ENIAC Tubes image by flickr |
जगातला पहिला इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॉम्प्युटर फेब्रुवारी १९४६ मध्ये अमेरिकेतल्या पेन्सिल्व्हानिया विद्यापीठात तयार करण्यात आला. तो ENIAC ( Electronie Numerical Integrator and Caleulalor) या नावाने ओळखला जाऊ लागला. पहिल्या पिढातला हा कॉम्प्युटर व्हॅक्यूम ट्यूब तंत्रज्ञानावर आधारित होता. दहा अंकी संख्यांचा गुणाकार तो तीन मिलीसेकंदात करीत असे. तर दर सेकंदाला तो पाच हजार बेरजा करीत असे! इनियाक कॉम्प्युटरमध्ये अठरा हजार निर्वात नळ्या, सत्तर हजार रोधक, दहा हजार कपॅसिटर्स आणि सहा हजार बटनं होती. त्याची लांबी शंभर फूट, उंची दहा फूट तर रुंदी तीन फूट होती. त्याचं वजन होतं तीस टन. त्याला चालविण्यासाठी दीडशे किलोवेट इतकी वीज लागत असे.
The invention of the transistor enabled the computer to reduce its enormous size. Now there are computers that are small enough to fit in a small briefcase. They also consume very little electricity. The previous four generations of computers were based on vacuum tube technology, transistor and printed circuit technology, and integrated circuit technology, respectively. Silicon chips weighing only a few grams and measuring only two square inches began to be used in computers from fourth generation computers.
![]() |
Cray-2 |
ट्रांझिस्टरच्या शोधामुळे कॉम्प्युटरचा प्रचंड असा आकार नंतर कमी करता आला. आता तर छोट्या ब्रिफकेसमध्ये मावू शकतील इतक्या लहान आकाराचे व वजनाचे कॉम्प्युटर निघाले आहेत. त्यांना वीजही अगदी कमी लागते. कॉम्प्युटरच्या यापूर्वीच्या चार पिढया अनुक्रमे व्हॅक्यूम ट्यूब तंत्रज्ञान, ट्रांझिस्टर आणि प्रिंटेड सर्किट तंत्रज्ञान, इंटिग्रेटेड सर्किट तंत्रज्ञान यावर आधारीत होत्या. चौथ्या पिढीतल्या कॉम्प्युटरपासून केवळ काही ग्रॅम वजनाची आणि केवळ दोन चौरस इंच आकाराची सिलिकॉन चिप कॉम्प्युटरमध्ये वापरण्यास सुरूवात झाली.
Cray-2 is a very fast electronic computer that can do two hundred and fifty million calculations in one second. The fifth generation of computers based on artificial intelligence can compete with human intelligence.
![]() |
image_by_gerd_altman_zuLJd |
क्रे-२ हा अतिजलद इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर एका सेकंदात दोनशे पन्नास दशलक्ष आकडेमोड करू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत कॉम्प्युटरची पाचवी पिढी तर मानवी बुद्धिमत्तेशी बरोबरी करू शकते.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box