How is honey obtained from a Bee-hive? मधुमक्षिकापेटीपासून मध कसे मिळविले जाते?
The beehive is used to keep bees and to collect the honey they produce. The beehive has vertical frames. These frames are fitted with metal mesh. The nets are hexagonal in shape like beehives. Due to this structure, bees are attracted to the hive and stay in the hive.
मधुमक्षिकापेटी ही मधमाशा पाळण्यासाठी व त्यांनी तयार केलेला मध गोळा करण्यासाठी वापरली जाते. मधुमक्षिकापेटीत उभ्या चौकटी बसविलेल्या असतात. या चौकटींमध्ये धातूच्या जाळ्या बसविलेल्या असतात. त्या जाळ्या मधमाश्यांच्या पोळ्याप्रमाणे षट्कोनी आकाराच्या असतात. अशा रचनेमुळे मधमाशा पेटीकडे आकृष्ट होतात व पेटीत राहू लागतात.
![]() |
Worker Bee (कामकरी मधमाशी ) |
The box is home to a queen bee, thousands of worker bees, and thousands of males during certain seasons. The queen bee lays fifteen hundred eggs daily and one and a half lakh eggs in one season. Workers do many jobs, such as cleaning bee hives, feeding on larvae hatching, and collecting honey. drone bee (Males) take part in reproductive activities. drone bees mate with new generations of queens and die soon after.
पेटीत एक राणी मधमाशी, हजारो कामकरी मधमाशा आणि काही विशिष्ट ऋतूत हजारो नर राहतात. राणी मधमाशी दररोज पंधराशे आणि एका ऋतूत अडीच लाख अंडी घालते. कामकरी मधमाशा पोळे स्वच्छ करणे, अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्यांना भरविणे, मध गोळा करणे अशी अनेक कामे करतात. नर मधमाश्या प्रजोत्पादन क्रियेत भाग घेतात. नर मधमाश्या नव्या पिढीतल्या राण्यांशी संग करतात व त्यानंतर लगेच मरून पडतात.
Honey is the food of bees. One bee makes forty to eighty thousand rounds from flower to hive. She has to fly three kilometers for each round. The bee absorbs the nectar from the flower. In this work, her jaw acts like an absorption tube. The honey or nectar is collected in a bag near the bee's stomach. The worker bee collects honey and enters the beehive. There she releases the wax out of her stomach. The wax sticks to the edges of the metal mesh and stores the collected honey. In this way honey is collected in a metal net between the boxes in the beehive.
मध हेच मधमाशीचे अन्न असते. एक मधमाशी फुलापासून पोळ्यापर्यंत चाळीस ते ऐंशी हजार फेऱ्या मारते. प्रत्येक फेरीसाठी तिला तीन किलोमीटर उडावे लागते. मधमाशा फुलातला मकरंद शोषून घेते. या कामात तिचा जबडा एखाद्या शोषनळीप्रमाणे काम करतो. मधमाशीच्या पोटाजवळील पिशवीत हा मध वा मकरंद गोळा होतो. कामकरी मधमाशी मध गोळा करून मधुमक्षिका पेटीत येते. तेथे ती आपल्या पोटातून मेण बाहेर सोडते. ते मेण ती धातूच्या जाळ्यांच्या कडांना बाजूबाजूने चिकटविते आणि त्यात गोळा करून आणलेला मध साठवते. अशाप्रकारे मधुमक्षिकापेटीतल्या चौकटींमधील धातूच्या जाळ्यात मध गोळा होतो.
When all the nets are filled with honey, they are taken out and honey is extracted from them. The beehive is preferably placed near a garden or field. By doing this, the bees collect nectar from the flowers and turn it into honey.
सर्व जाळ्या मधाने भरल्या की, त्या बाहेर काढल्या जातात आणि त्यातला मध काढून घेतला जातो. मधुमक्षिकापेटी शक्यतो एखाद्या बागेजवळ किंवा शेतात ठेवली जाते. असं केल्याने मधमाश्या फुलांमघला मकरंद गोळा करून पेटीत येतात व त्याचे मधात रूपांतर करतात.
As honey is collected in the beehive, chemical changes are made in the sugar in it. The water in the honey is removed. So it lasts a long time. Honey contains sugar, malt, minerals, proteins, acids, enzymes.
मधुमक्षिकापेटीत मध गोळा होत असताना त्यातील साखरेत रासायनिक बदल घडवून आणला जातो. मधातले पाणी काढून टाकले जाते. त्यामुळे तो दीर्घकाळ टिकून राहतो. मधात साखर, माल्ट, खनिजे, प्रथिने, आम्ले, एन्झाइम्स असतात.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box