The fruit is from which plant? Will it be used to prevent corona? हे फळ कोणत्या वनस्पति चे आहे ? याचा उपयोग कोरोनाला रोखण्यासाठी होईल का ?
![]() |
Image by WikimediaImages from Pixabay |
The world is still fighting the corona virus. One of the best ways to get rid of corona is to eat certain foods. There is a lot of fake news. The fake news that is going viral these days is that the corona is destroyed by the seeds of the plant Dhotra. So let's find out the special features of this plant ...
जग अजूनही कोरोना विषाणूशी लढा देत आहे. कोरोनापासून मुक्त होण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे काही पदार्थ खाणे. अशा बर्याच बनावट बातम्या आहेत. त्यामध्ये आजकाल मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेली बनावट बातमी म्हणजे धोतरा या वनस्पतीच्या बियांमुळे कोरोना नष्ट होतो.चला तर मग जाणून घेऊया या वनस्पतीची खास वैशिष्टे...
The nine plants of the Datura species of the Solanaceae family are commonly called Dhotra. Dhotra is a poisonous plant. There are three varieties of dhotra plant. White, bluish black and Rajdhotra. Black dhotra (Datura metal) and white dhotra (Datura stramonium) are the most common varieties in India.
सोलॅनसी वंशातील दतुरा प्रजातीतील नऊ वनस्पतींना सामान्यपणे धोतरा म्हटले जाते. धोतरा ही वनस्पती विष वर्गातील आहे. धोतरा वनस्पतीच्या तीन जाती आहेत. पांढरा, निळसर काळा आणि राजधोत्रा. भारतात काळा धोतरा (दतुरा मेटल) आणि पांढरा धोतरा (दतुरा स्ट्रॅमोनियम) या जाती विशेषकरून दिसून येतात.
![]() |
image_by_l_a_v_from__0UdRy |
White and black dhotra plants are found all over India and appear to be planted in gardens. Her height is 1 mtr. And her lifespan is only one year. The leaves are lanceolate, simple, triangular and ovate, oblong, large, somewhat segmented and obtuse at the base. Some hybrids of this plant are planted in the garden and their trunks are crazy and somewhat purple.
पांढरा आणि काळा धोतरा वनस्पति भारतात सर्वत्र आढळते बागेतही लावलेली दिसते. तिची उंची सु. १ मी. असून तिचा आयुःकाल एक वर्षच असतो. पाने लवदार, साधी, त्रिकोणी व अंडाकृती, एकाआड एक,मोठी , काहीशी खंडित व तळाशी विषम असतात. या झाडाचे काही संकरित प्रकार बागेत लावतात त्यांची खोडे वेडेवाकडे व काहीप्रमाणात जांभळट असतात.
Dhotra is a shrub found all over India in the hills and in the northwestern Himalayas. The leaves are pale green, 12-15 cm long and somewhat jagged (broken) with large flowers 7-20 cm. The long, white (sometimes bluish outside) bones are straight, elongated and have sharp spines on them, which can be broken into four shells.
धोतरा हे झुडूप भारतात सर्वत्र टेकड्यांत आढळते व वायव्य हिमालयात तर ते सामान्यतः दिसते रस्त्यांच्या दुतर्फा आणि खेडोपाडी शेतांच्या आसपास व उकिरड्याशेजारी आढळते. याची पाने फिकट हिरवी, १२–१५ सेंमी, लांब व काहीशी दातेरी (खंडित) असतात फुले मोठी ७–२० सेंमी. लांब, पांढरी (कधी बाहेर निळसर) बोंडे सरळ लांबट व त्यांवर सरळ तीक्ष्ण काटे असून तडकून त्यांची चार भाग होतात.
Dhatura arboria is a large variety of dhotra planted in the garden and is commonly found in Mahabaleshwar. Shake 18–20 cm It has long white flowers and smells like musk. Its fruits are not thorny. In many respects, it resembles a black dhoti. 1,240 m It is found everywhere up to the height.
धतुरा आर्बोरिया ही धोतऱ्याची मोठी जात बागेत लावतात व महाबळेश्वरात सामान्यपणे आढळते. हिला १८–२० सेंमी. लांबीची पांढरी फुले येतात व त्यांना कस्तुरीसारखा वास येतो तिची फळे काटेरी नसतात. कित्येक बाबतीत हिचे काळ्या धोतऱ्याशी साम्य आहे निसर्गतः समुद्रसपाटीपासून सु. १,२४० मी. उंचीपर्यंत ही सर्वत्र आढळते.
To increase the intensity (intoxication) of marijuana and alcohol, dhotra seeds were added to it. Rub the juice of the leaves on swelling, mumps, pain, arthritis, mastitis etc. B is columnar (contractile), intoxicating (numbing), analgesic, bitter, windy and lamp (appetite enhancer). Seeds or leaves are smoked on asthma. The juice of the leaves is rubbed on the scorpion bite instead of the bite. Dhoti flowers are called 'Shivshekhar' as they have a religious relationship with Lord Shankar.
गांजा व मद्याची तीव्रता (मादकता) वाढविण्यास त्यात धोतऱ्याचे बी घालीत असत. सूज, गालगुंड, वेदना, संधिवात,स्तनदाह इत्यादींवर पानांचा रस चोळतात. बी स्तंभक (आकुंचन करणारे), मादक (गुंगी आणणारे), वेदनाहारक, कडू, वायुनाशी व दीपक (भूक वाढविणारे) असते. दम्यावर बियांची किंवा पानांची धुरी देतात. विंचूदंशावर दंशाच्या जागी पानांचा रस चोळतात. धोतऱ्याच्या फुलांचा श्री शंकर-महादेव भगवान शी धार्मिक संबंध असल्याने त्याला ‘शिवशेखर’ असे म्हणतात.
![]() |
Image by WikimediaImages from Pixabay1 |
In general, the seeds of dhotra are bitter in taste and if eaten in small quantities, the eater becomes unconscious. In the past these seeds were used for kidnapping and train robbery. After eating these seeds, the mouth becomes dry, the voice becomes harsh and speech difficulties occur. After that, paralysis can occur. Urinary incontinence and pain may occur. The breathing process speeds up and then slows down. This can lead to coma and epilepsy, which can lead to death. Therefore, direct use of dhotra seeds should be avoided and you should not fall prey to any fake articles / videos.
सर्वसाधारणपणे धोतऱ्याच्या बिया चवीला कडू लागतात बिया थोड्या प्रमाणात खाल्ल्यास खाणारा बेशुद्ध पडतो. पूर्वी या बियांचा उपयोग अपहरण आणि रेल्वे मध्ये लूट करण्यासाठी वापरली जात होती. या बिया खाल्ल्यानंतर तोंड कोरडे होते आवाज कठोर होतो आणि बोलण्यात अडचणी निर्माण होतात.त्यानंतर अंगांचा पक्षाघात होऊ शकतो. लघवीचा त्रास आणि वेदना होऊ शकतात . श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया वेगवान होते आणि नंतर मंदावते. त्यानंतर कोमा आणि अपस्मार होण्याची दाट शक्यता असते आणि त्यातून मृत्यू सुद्धा ओढवू शकतो.त्यामुळे धोत्र्याच्या बियांचे थेट वापर करणे टाळावे आणि आपण कोणत्याही बनावट लेख / व्हिडिओला बळी पडू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box